जळगावमहाराष्ट्र

स्वातंत्र्य सेनानी शहादू चौधरींना आडगावात श्रद्धांजली

प्रतिनिधी एरंडोल- तालुक्यातील आडगाव येथील स्वा.सै.शहादू सोमा चौधरी यांच्या ४४ व्या पुण्यतिथी निमित्ताने हुतात्मा स्मारकाच्या सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हभप.भानुदास महाराज हे होते.

व्यासपिठावर मोहनदास महाजन,मधुकर पाटील, पांडूरंग पाटील,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील,डी.एन पाटील,संतोष पाटील हे होते.

प्रल्हाद पाटील,मधुकर पाटील,प्रमोद पाटील यांनी विचार व्यक्त केलेत,यावेळी आडगाव हे स्वातंत्र चळवळीत अग्रस्थानी असलेले गाव, या गावात १९४२ च्या लढ्यात ३ हुताम्ये झाल्याचा इतिहास आहे,या गावात तालूक्यात सर्वात जास्त ३३ स्वातंत्र सैनिक होऊन गेलेत,हल्ली या गावातील ८० तरुण भारतीय सैन्य दलात आहेत,जिल्हयात केवळ दोनच ठिकाणी हुतात्मा स्मारक आहेत, त्यातील एक आडगाव येथे आहे,निस्वार्थ नेतृत्व असल्याने मंत्र्यांना जाब विचारण्याचे धाडस त्यांच्या कडे होते,अस्पृश्यता निवारण्यासाठीचे राज्य सरकारचे पहिले बक्षिस आडगावला १९६५ साली मिळाले होते, ते केवळ शहादू जिभाऊंनी याकामी चळवळ उभारल्यामुळे,अशी माहिती वक्त्यांनी आपल्या भाषणातून चौधरी यांचे बाबत दिली.

यावेळी भगवान चौधरी, भगतसिंग पाटील,दत्तू पाटील,रविंद्र पवार,मनोहर चौधरी,लक्ष्मण ठाकूर,महेश चौधरी हे उपस्थित होते.

सुत्रसंचालन ज्ञानेश्वर महाजन यांनी तर दिलीप पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button