जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथील भोई समाजतर्फे जगप्रसिद्ध समाजसुधारक, मानवतावादी संत श्री संत शिरोमणी भीमा भोई महाराज यांच्या १७६ व्या जयंतीनिमित्त आ. अँड.अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन, माल्यार्पण, तसेच अभिवादन व विचारप्रबोधन कार्यक्रम उत्साहात संपन्न….

एरंडोल (प्रतिनिधी) संत शिरोमणी भीमा भोई यांची जयंती राम मंदिर समोर तालुक्याचे आमदार ,अँड. अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून व प्रतिमा पूजन करून दिनांक 25 मे रोजी सकाळी दहा वाजता साजरी करण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव महिला भगिनी व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
   या कार्यक्रमात उपस्थित आ. अमोल पाटील यांनी सांगितले की , संत भीमा भोई महाराज यांनी समाजाला दिलेला मानवता, समता, बंधुता व सर्वसमावेशकतेचा संदेश आजही प्रेरणादायी असल्याचे सांगितले. समाजाची प्रथमच या वेळेस मी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थिती पाहून भारावून गेलो या समाजाने व्यवसायासह आता शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती केलेली आहे प्रत्येक समाजाला न्याय दिला असून या समाजाला ही लवकर न्याय मिळेल समाजाचे युवा गट विकास अधिकारी म्हणून निवड झालेले गौरव पांडुरंग मोरे तसेच राज्यस्तरीय पुरस्कार मिळवणारे मयूर वाल्डे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. अमोल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर , शिवसेनेचे गटनेते प्रा. मनोज पाटील यांनीही मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष सुनिता रुपेश माळी, माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी, नगरसेवक अनिल महाजन , नय्युम पठाण, रवींद्र महाजन इम्रान सय्यद महेश देवरे अमोल तांबोळी ,एन डी पाटील ,नितेश चौधरी, बबलू चौधरी, नगरसेविका मनकर्णिका ताई चौधरी आनंद दाभाडे राहुल तिवारी, जावेद मुजावर ,अतुल महाजन ,अल्ताफ पठाण पंकज मराठे अतुल मराठे
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अनिल भोई उपाध्यक्ष राजू भोई सेक्रेटरी नरेश भोई किरण भोई नितीन भोई गणेश भोई विलास वालडे मयूर भोई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले
कार्यक्रमात समाजातील विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत शिक्षण, संघटन व समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समाजाने प्रगती साधावी असे आवाहन केले. तसेच संत शिरोमणी भीमा भोई महाराज यांच्या विचारांचे जतन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी भोई समाजातील ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग, महिला भगिनी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button