हिंदू-मुस्लिम एकतेचे श्रध्दास्थान नथ्थूबापू यांचा उरूस यात्रा आज पासून सुरू….. , मनोकामना पूर्ण होण्यासाठी नवस-घोडा-चादर चढविणे-परंपरा …. , सट्टा-पत्ता, जुगार, फसवणूकीचे खेळ नसावेत-महिलांसह नागरीकांची मागणी

प्रतिनिधी – एरंडोल येथे सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेले जनतेचे श्रध्दास्थान नथ्थू बापू यांचा उरुस यात्रा भरण्यास सुरूवात झाली आहे.आज दि.२९ नोव्हेंबर पासुन त्यास सुरुवात होणार आहे.या यात्रेत आपली मनोकामना पूर्ण झाल्यास नथ्थू बापू यांच्या समाधी स्थळावर कापडी घोडा चढविणे, चादर चढविणे अशी परंपरा आहे. म्हणूनच सदर यात्रेला जागृत देवस्थान म्हटले जाते.
सुमारे १०० वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी दूरदूरचे उंच पाळणे, खेळ, मौत का कुवा दाखल होणे सुरू असून त्यासाठी बच्चे कंपनी व त्यांची दरवर्षी भाविक आतुरतेने वाट पाहतात.
मौत का कुंवा, धडकगाडी,गगनचुंबी पाळणे, रेल्वेगाडी मात्र लहानांसह महिलांची आवडीचे खेळ असतात.
सुमारे २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान चालणाऱ्या या यात्रेत महिला वर्ग वर्षभर लागणार्या गृहोपयोगी लाटणे, पोळपाट यासह चाळण्या आदी भांडी घेतात तर खवय्यांसाठी गुळाची जिलेबी, गरमागरम भज्जीची मजाच काही वेगळी असते.
सदर यात्रेत फसवे खेळ, सट्टा-पत्ता, जुगार, गुडगुडीसारखे फसवणूकीचे खेळ सुद्धा काही वेळेस लावले जातात.यासाठी दरवर्षी विरोध होतो.त्यामुळे असे खेळ नसावेत अशी मागणी महिलांसह भाविकांनी केली असून संबंधितांनी दखल याची घ्यावी असा इशारा दिला आहे.एक गोष्ट खेदाने नमुद केली जाते की,यात्रे खाऊसाठी घरून पैसे आणणारे तरुण व लहान मुले मात्र फसवणूकीचे खेळ, पत्त्यांचे जुगारात पैसे संपवितात आणि उपाशीपोटी घरी येतात.
निदान यावर्षी तरी असे फसवेगिरीचे खेळ थांबावावे अशी मागणी करण्यात आली आहे व यासाठी शांतता समिती बैठक व्हावी अशी मागणी शांतता समितीच्या काही सदस्यांची मागणी आहे.




