जळगावमहाराष्ट्र

द्वारका नगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढला उपद्रव

असंख्य महिला व नागरिकांचे पालिकेला निवेदन

अमळनेर:-शहरातील द्वारका नगरमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांना अक्षरशः घरातून बाहेर निघणे मुश्किल झाले आहे.यामुळे त्रासलेल्या महिला व नागरिकांनी पालिकेच्या मुख्याधिकारीना दुसऱ्यांदा तक्रार (निवेदन)अर्ज देऊन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.
यासंदर्भात येथील नागरिकांनी सांगितले की या परिसरात एक गरोदर बाई व 65 वर्षीय वृद्ध महिलेच्या मागे लागले होते,वृद्ध महिला बचाव करतांना खाली पडल्या त्यामुळे त्यांना दुखापत झाली.तसेच लहान मुले शाळेत व ट्युशन ला जायला देखील घाबरतात.यासंदर्भात नगरपालिकेला 2 महिन्या पूर्वी आणि आता परत 10 दिवसापूर्वी स्मरणपत्र देऊनसुद्धा पालिकेचे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.तरी पालिकेने उपाययोजना करून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी राजेंद्र देसले, श्रावण कोळी,तृप्ती पाटील,कामिनी पाटील,वैष्णवी पाटील,उज्वला वाघ,पी के सोनवणे,एस टी शिंदे,मनोज पाटील,रुद्र पाटील,लखीचंद पाटील,दिलीप पाटील यासह असंख्य महिला व पुरुषांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button