जळगावमहाराष्ट्र

पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असून देखील नगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नविन वसाहती धारक हैराण.

प्रतिनिधी – एरंडोल येथील नविन वसाहतीमध्ये नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना वेळवर पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. अंजनी धरणात पुरेसा पाणी साठा असून देखील फक्त नियोजना अभावी रहिवाशांना अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.
       दरम्यान एरंडोल शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अंजनी धरणात पुरेसा पाणी साठा उपलब्ध असून देखील शहराला पाच दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो परंतु सदर पाणीपुरवठा शहरातील नविन वसाहती मध्ये कधीही वेळेवर होत नसल्याचे तसेच अपूर्ण  होत  असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.काही दिवसांपूर्वी मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी शहरातील समाज माध्यमांवर शहरात पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते परंतु आजतागायत कधीही त्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा झाला नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे शहरातील नविन वसाहती मध्ये तर कधीही वेळेवर नळांना पाणी येत नाही.नागरिकांना दिवसभर पाण्याची प्रतिक्षा करावी लागते तसेच या वसाहतीत बरेच रहिवासी नोकरवर्ग असल्याने पाण्याच्या वेळेची अनिश्चितता असल्याने बऱ्याचदा रजा घेऊन किंवा काहीतरी नियोजन करून दिवसभर पाण्याची वाट बघत घरी थांबावे लागते.कधीकधी पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी ज्या दिवशी पाणी येणार आहे त्याच्या आधीच पाणी पुरवठा करतो.त्यामुळे अनेकांना पाणीच मिळत नाही व तब्बल पाच दिवस वाट बघावी लागते.सध्या ऊन तापू लागले असल्याने पाण्याची मागणी वाढत असतांना निव्वळ सदर विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.परिणामी नागरिकांना पाणी जार विकत घ्यावे लागत आहे. नविन वसाहती मधील रहिवंश्यांकडून सर्वात जास्त कर आकारला जातो.तरी सुद्धा त्यांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहे.शहरातील काही नविन वसाहती शहराच्या शेवटच्या भागात असल्याने याठिकाणी नेहमी पाणी कमी दाबाने येते व त्यामुळे त्यांना पुरेसे पाणी मिळत नाही.यासाठी काही भागातील महिला येत्या काही दिवसांनी नगर पालिकेवर हंडा मोर्चा काढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.सदर समस्येकडे आमदार अमोल पाटील,मुख्याधिकारी अमोल बागुल,नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकुर,नवनियुक्त नगरसेवक यांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button