जळगावमहाराष्ट्र

युवकांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावेत.-हैबतराव पाटील.

संजीवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे व्यसनमुक्तीवर जनजागृती.

प्रतिनिधी एरंडोल-व्यसनांमुळे आयुष्य उध्वस्त होत असल्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असे आवाहन
निवृत्त मंडळ कृषी अधिकारी हैबतराव पाटील यांनी केले.येथील संजीवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रातर्फे छत्रपती शाहू महाराज जयंती व जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्याकार्यक्रमात ते बोलत होते.संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील अध्यक्षस्थानी होते.

छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.संजीवन व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्रातर्फे शहरातील विविध शैक्षणिक संस्था,सार्वजनिक ठिकाणी ‘नशा करी दुर्दशा’ या विषयावर
पथनाट्य सादर करून तसेच व्यसनाचे दुष्परिणाम या विषयावर पत्रके वाटप करून जनजागृती करण्यात आली.यावेळी निवृत्त मंडळ कृषी अधिकारी हैबतराव
पाटील यांनी व्यसनांमुळे संसार उद्धवस्त होत असल्यामुळे सर्वांनी व्यसनांपासून दूर रहावे असे आवाहन केले. व्यसनांमुळे होणा-या आजारांबाबत युवकांनी समाजात जनजागृती करण्याची गरज असल्याचे सांगितले.संस्थेचे
अध्यक्ष रोहिदास पाटील यांनी केंद्रातर्फे व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी राबवण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.गुटखा,सुगंधी सुपारी, तंबाखू, दारू, धुम्रपान, अंमली पदार्थांचे सेवन यांसारख्या व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.व्यसन कसे सोडावे व व्यसनमुक्त जिवन कसे जगावे याबाबत त्यांनी माहिती दिली.केंद्राचे प्रकल्प
संचालक राजेंद्र ठाकरे यांनी प्रास्ताविक केले.गोकुळ पाटील यांनी आभार मानले.

केंद्रातर्फे शैक्षणिक संस्थांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या
कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमास निवृत्त केंद्रप्रमुख गुलाबराव पाटील,अजय महाजन,गोकुळ पाटील,खुशाल महाजन,बबलू पाटील यांचेसह नागरी व विद्यार्थी उपस्थित होते.व्यसनमुक्ती
केंद्राच्या पदाधिका-यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button