गौ सन्मान आवाहन अभियान अंतर्गत मोर्चा काढून दिले निवेदन.

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील सर्व गौ प्रेमी,गौ सेवक,गौ पालक,हिंदुत्ववादी संघटनांनी तहसीलदार गोपाळ पाटील यांना गौ सन्मान अभियान अंतर्गत मोर्चा काढून निवेदन दिले.
यावेळी भगवा चौक येथून बालगोपाल वारकरी वेशभूषेत टाळ मुर्दुंग तंबोरा सह रामकृष्ण हरी च्या निनादात गौमाता नंदीदेव यांच्या सोबत समाजातील महिला पुरुष उद्योजक नगरसेवक यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चा मेनरोड,बुधवार दरवाजा,मारीमाता चौक, म्हसावद नाका मार्गे तहसील कार्यालयावर काढण्यात आला व निवेदन देण्यात आले निवेदनात देशी गौ मातेला राष्ट्रमाता म्हणून दर्जा मिळावा,गौ हत्या बंद व्हावी व साठी केंद्रीय कायदा केला पाहिजे,गौमातेस सन्मान व सेवा सुरक्षा दिले पाहिजे अशा विविध मागण्या आहेत.
याप्रसंगी राजलक्ष्मी गौ शाळेचे तथा नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील,समर्पण गौ शाळेचे रविंद्र पाटील,राजमाता जिजाऊ गौ शाळेचे राजू पाटील,माजी नगरसेवक जगदीश ठाकुर,उपनगराध्यक्षा सुनीता माळी,नगरसेविका छाया दाभाडे,कमल पाटील,शोभा साळी,आरती ठाकुर,नगरसेवक अनिल महाजन,नितेश चौधरी, गोपाल पाटील,रश्मी दंडवते,प्रसाद दंडवते,माधव जगताप,गणेश वाणी, करण पाटील,महावीर भोई,जगदीश परदेशी,भैया चौधरी,बाळा काठेवाडी,भालचंद्र शिंपी, गोपाळदास पाटील,अजय निकम,मदन ठाकुर यांच्या सह शेकडो महिला ,पुरुष ,वारकरी संप्रदायातील मंडळी उपस्थित होते.याप्रसंगी पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड,अनिल पाटील व कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.





