जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

एरंडोलमध्ये पाणीटंचाईविरोधात उद्या जनआक्रोश मोर्चा नगरपालिका प्रशासनाला निवेदन देणार; नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन..

प्रतिनिधी एरंडोल : शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शहरात वेळी-अवेळी तसेच अपुरा आणि अर्धवट पाणीपुरवठा होत असल्याने अनेक भागांतील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, दि. १५ मे रोजी सकाळी १० वाजता शहरवासीयांच्या वतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा मोर्चा भगवा चौक येथून सुरू होऊन नगरपालिका कार्यालयावर धडकणार आहे. शहराला सध्या ६ ते ७ दिवसांआड होणारा पाणीपुरवठा नियमित आणि दर ३ दिवसांनी करण्यात यावा, तसेच ठराविक वेळेत सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, ही प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार आहे.
मोर्चादरम्यान नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकुर तसेच मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन देण्यात येणार असून नागरिकांच्या पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
शहरातील वाढती उष्णता आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या जनआक्रोश मोर्चात शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button