ताज्या बातम्या

महसूल विभागाची धडक कारवाई : अंतुर्लीतून रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर जप्त


प्रतिनिधी एरंडोल:- तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत अंतुर्ली येथे रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर जप्त केले. ही कारवाई मंगळवार, २३ जून २०२६ रोजी रात्री करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, अंतुर्ली परिसरात अवैधरीत्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने छापा टाकून रेतीने भरलेले चार ट्रॅक्टर ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेली वाहने पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय, एरंडोल येथे जमा करण्यात आली आहेत.
या कारवाईत उत्राण मंडळाचे मंडळ अधिकारी नंदीम शेख, ग्राम महसूल अधिकारी रविराज पाटील तसेच सुदर्शन पवार, आकाश बनकर, अमर भिंगारे, संदीप ढोले, संदीप पाटील, रमेश मोरे, गजानन बहुरे आणि कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button