जळगावमहाराष्ट्र

बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करा; अन्यथा आंदोलन – जाकीर पिंजारी यांचा पारोळा नगर परिषदेला इशारा

पारोळा प्रतिनिधी : नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणि शिस्त येण्यासाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जाकीर पिंजारी यांनी पारोळा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, लवकरात लवकर निर्णय न झाल्यास धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेत अनेक विभागांमध्ये कर्मचारी उपस्थिती आणि कामकाजाबाबत नागरिकांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या ये-जा वेळेवर नियंत्रण राहील तसेच कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी वाढेल. त्यामुळे प्रशासनाने ही प्रणाली तात्काळ लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, या मागणीबाबत अनेक वेळा प्रशासनाशी चर्चा करूनही ठोस निर्णय घेतला जात नसल्याची खंत व्यक्त करत, लवकरात लवकर बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू न केल्यास नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जाकीर पिंजारी यांनी दिला आहे.
यावेळी निवेदन देताना जाकीर पिंजारी यांच्यासह मलिक एम. आय. एम. कुरेशी, आरिफ कुरेशी, अख्तर पिंजारी, खलील शेख, आकीब बेलदार, जावेद कुरेशी, आरिफुद्दीन शेख, आका कुरेशी, मुजाहिद कुरेशी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button