जळगावमहाराष्ट्र

वनकोठे येथील सहवास मतिमंद मुलांच्या संस्थेला महिनाभराचे राशन; वृक्षारोपणासह गोशाळेला पशुखाद्य वाटप

ईश्वरभाऊ सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

प्रतिनिधी एरंडोल : सामाजिक कार्यकर्ते ईश्वरभाऊ सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजातील गरजू घटकांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचा उपक्रम राबविण्यात आल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या उपक्रमांतर्गत वनकोठे येथील सहवास मतिमंद मुलांची संस्था येथे संस्थेतील मुलांसाठी एक महिन्याचे आवश्यक राशन देण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय गोसेवेच्या भावनेतून गोशाळेतील गाईंना ढेपची पोती देण्यात आली.

वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमातून गरजू मुलांना मदत, पर्यावरण संवर्धन आणि गोसेवा अशा विविध सामाजिक कार्यांचा संगम साधण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते ईश्वरभाऊ सोनार यांना वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, हितचिंतक व सहकाऱ्यांकडून प्रत्यक्ष भेटून तसेच दूरध्वनीद्वारे मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक कार्याची हीच वाटचाल पुढेही सुरू राहावी, अशा सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या सामाजिक उपक्रमात समाधान पाटील, ज्ञानेश्वर महाजन, विशाल पाटील, सुशील पाटील, मुरलीधर सोनवणे, ऋतिक खोकरे, शुभम अहिरे, अनंत अहिरे, दिनेश महाजन, मोहित सोनार, विकास पाटील, सोपानभाऊ महाजन, योगेश महाजन यांच्यासह मित्रपरिवार सहभागी झाला होता.

वाढदिवस साजरा करण्याची सामाजिक बांधिलकीची अनोखी पद्धत

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छा व सत्कार न करता गरजूंसाठी अन्नधान्य, पर्यावरणासाठी वृक्षारोपण आणि गोशाळेसाठी पशुखाद्य देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे ईश्वरभाऊ सोनार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button