क्रीडाजळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या दोन खेळाडूंची आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

एरंडोल : अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात ६ सप्टेंबर रोजी झालेल्या एरंडोल विभागीय ज्युडो स्पर्धेत गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या दोन खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून सहभागी झालेल्या भूषण भानुदास आरखे (७३ किलो) आणि सुजल अनिल भोई (६० किलो) यांनी आपापल्या वजनगटात यश मिळविले.
या कामगिरीच्या आधारे दोन्ही खेळाडूंची ९ सप्टेंबर रोजी साक्री, जि. धुळे येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ ज्युडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंना गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे अध्यक्ष व प्रशिक्षक भानुदास आरखे, वस्ताद अनिल मराठे आणि दिलीप मराठे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल आमदार अॅड. अमोलदादा पाटील, अॅड. किशोरभाऊ काळकर, महाविद्यालयाचे अध्यक्ष अमितदादा पाटील, संजय काबरा, पंकज काबरा, प्रा. मनोज पहेलवान, सुनील देशमुख यांच्यासह गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे पदाधिकारी, संचालक, आश्रयदाते व सभासदांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button