क्राईमजळगावमहाराष्ट्र

एरंडोल तालुक्यातील कढोलीत तरुणावर झाडली गोळी.

प्रतिनिधी -एरंडोल तालुक्यातील कढोली गावात आज (दि. ३) दुपारी ४ च्या सुमारास एका ३१ वर्षीय तरुणावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जळगाव शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
प्राथमिक माहितीनुसार, जखमी तरुण प्रवीण पुंडलिक बडगुजर (वय ३१)एका खासगी कंपनीत कामाला आहे. उद्या (दि. ४) पारोळा येथील रथोत्सव असल्याने तो आपल्या आई-वडिलांना घेऊन जाणार होता. आज दुपारी ४ च्या सुमारास तो कढोली गावात अंडा पावच्या गाडीवर उभा असताना त्याठिकाणी दोन ते तीन जण आले त्यातील एकाने अचानक गोळी झाडली ती त्याच्या हाताच्या खांद्याखाली छातीजवळ घुसली. यामुळे मोठा रक्तस्राव झाला, ज्यामुळे त्याला तातडीने उपचारांसाठी जळगाव येथे हलवावे लागले. सदर गोळीबार करणारे जखमींच्या परिचित असल्याचे बोलले जात आहे.
या घटनेमुळे गावात आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेच्या ठिकाणी एरंडोल पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड व कर्मचारी तत्काळ दाखल झाले असूनपोलिसांकडून तपास सुरू केला असुन दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजते.रात्री उशिरा पर्यंत एरंडोल पोलिस स्टेशनला कुठलीही नोंद झालेली नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button