एरंडोल येथे नथ्थुबापू समाधीवर चढवली मानाची भगवी चादर.

प्रतिनिधी एरंडोल:- सालाबादप्रमाणे यावर्षी देखील पांडव नगरी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मानाची भगवी सादर नथ्थुबापू समाधीवर मोठ्या उत्साहात सहवाद्य चढविण्यात आली.
मानाची भगवी चादर वाजत गाजत मिरवणुकीला पांडव वाडा परिसरातून ढोल ताशांच्या गजरात हनुमानाची आरती करून सुरुवात झाली.
मिरवणुकीत तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. रमेश महाजन, राजेंद्र चौधरी, किशोर निंबाळकर, कुणाल महाजन, आनंदा चौधरी, अतुल महाजन, गोरख चौधरी, परेश बिर्ला
यांच्या उपस्थितीत आरती करून मिरवणुकीला सुरुवात झाली
श्रीरामांचा जयघोष, जय सियाराम घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी पंच कमिटी चे माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनार कृष्णा ओतारी, भूषण चौधरी, नितीन बोरसे, मयूर बिर्ला, मुन्ना महाले, राजेश शिंपी, दिनेश महाजन, उमेश साळी, प्रकाश पाटील, आकाश महाजन, मयूर मोहन महाजन, यश झांबरे, पवन साडी, नितीन महाजन, किरण लोहार, तुषार सोनार, राहुल ठाकूर, सिद्धार्थ परदेशी, यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते. तसेच पोलीस निलेश गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.




