जळगावमहाराष्ट्र

डॉ. डिगंबर महाले यांची महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्यागव्हर्निंग कौन्सीलमध्ये निमंत्रित सदस्यपदी निवड

अमळनेर – ( विशेष  प्रतिनिधी) – महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर ही राज्यातील व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठीत आणि शिखर संस्था आहे. सदर संस्थेत राज्यातील अग्रगण्य उद्योजक व व्यावसायिक सदस्य आहेत. संस्थेच्या पदाधिकारीपदीही अत्यंत महनीय व्यापारी व उद्योजक आहेत. या संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सीलमध्ये निमंत्रित सदस्यपदी (स्पेशल इन्व्हायटी) डॉ. डिगंबर महाले यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी डॉ. महाले यांना याबाबतचे नियुक्तीपत्र दिले आहे. अमळनेरच्या इतिहासात प्रथमच हा बहुमान डॉ. महाले यांच्या निमित्ताने मिळाला आहे.
पुढील वर्षी संस्थेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. हा ऐतिहासिक टप्पा उद्योग, व्यापार व विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. त्यासाठी आतापासूनच संस्थेने जय्यत तयारी सुरू केली आहे. सदर भव्य कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजन संदर्भात दीर्घानुभवी व्यक्तिमत्व जबाबदार पदी असावे यासाठी डॉ. महाले यांची ही विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक मान्यवरांनी डॉ. महाले यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button