एरंडोल येथील विद्यार्थ्यांचे अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

प्रतिनिधी एरंडोल – येथील विद्यार्थ्यांनी नागपूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या एस. के. अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे.
रिखोल येथील शिवदीप अकॅडमीच्या वतीने नागपूर येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत एरंडोल परिसरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध पारितोषिके पटकावली.
प्रथम स्तरात
राम भरतनाथ महाजन यांनी प्रथम, तर शंभूराज सोपान साळुखे यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
याच स्तरात अर्णव विश्वनाथ पाटील, कुलश्री ज्ञानेश्वर महाजन, वृषभ शैलेष पाटील व रिया जयवंत मोरे यांनी कॉन्सोलेशन पारितोषिक पटकावले.
द्वितीय स्तरात
कु. निशिका ज्ञानेश्वर महाजन हिने कॉन्सोलेशन पारितोषिक मिळविले.
तृतीय स्तरात
कु. कामिनी नितीन दुसे हिने द्वितीय क्रमांक पटकावून यश संपादन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना शिवदीप अकॅडमीचे संचालक दिनानाथ पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच प्राचार्य अनिल जनार्दन पाटील यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याशिवाय चैतन्य पाटील, इबाद नियाज अहमद, रोहित जयवंत मोरे, विभावरी भास्कर पाटील, आयुष प्रकाश वाढुळे, सम्राट संदीप कोतकर, वरुण प्रमोद माळी व प्रथमेश एकनाथ पाटील यांनीही स्पर्धेत सहभाग नोंदविला.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




