जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोलला नवीन घंटागाडीचे लोकार्पण; स्वच्छतेसाठी नगरपरिषदेचे पाऊल


प्रतिनिधी एरंडोल- शहरातील स्वच्छता यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला गती देण्यासाठी एरंडोल नगरपरिषदेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत नगरपरिषदेला प्राप्त झालेल्या नवीन घंटागाडीचे लोकार्पण गुरुवारी (दि. २६ फेब्रुवारी) उत्साहात पार पडले.
या घंटागाडीचे लोकार्पण लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्षा सुनिता माळी तसेच शिवसेना गटनेते प्रा. मनोज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी ही घंटागाडी मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास मुख्याधिकारी अमोल बागुल, सार्वजनिक आरोग्य समिती सभापती शारदा मराठे यांच्यासह विविध प्रभागांतील नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात अनिल महाजन, अमोल तंबोली, प्रशांत महाजन, रविंद्र महाजन, सय्यद इम्रानअली जाफरअली, छाया दाभाडे, पौर्णिमा देवरे, मनकरनाबाई चौधरी, सत्यभामाबाई पाटील, कल्पना पाटील, कागजी नजमाबी सईद, सय्यद शबानाबी नुरूद्दीन, भारती गुर्जर, कमल पाटील, आरती महाजन, गोपाल पाटील, अतुल महाजन आदींचा समावेश होता.
“शहराचे आरोग्य अबाधित राखणे ही आमची प्राथमिकता आहे. नवीन घंटागाडीमुळे कचरा उचलण्याच्या प्रक्रियेत सुसूत्रता येईल आणि शहर अधिक स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल,” असे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
नवीन घंटागाडीमुळे शहरातील दैनंदिन कचरा संकलन अधिक वेगवान व नियमित होणार असून स्वच्छतेच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button