एरंडोल मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी एक दिवसीय बंद मध्ये सहभाग

20 मे 2026 रोजी औषधांची दुकाने बंद राहणार… सतीश पाटील
एरंडोल.. अखिल भारतीय औषध विक्रेता संघातर्फे 20 मे 2026 रोजी एकदिवशीय बंदचे आवाहन केमिस्ट बांधवांनी केले आहे. ऑनलाइन औषध विक्री बंद करणे, कॉर्पोरेट्स द्वारे व्यावसायिक डिस्काउंट बंद करणे व बनावट औषधांना आळा बसविणे आदी अनेक मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात येणार आहे. येथील एरंडोल मेडिकल असोसिएशन ने देखील या बंदमध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग नोंदवला आहे. आज 20 मे 2026 रोजी औषधांची दुकाने बंद असणार आहेत. यामुळे लोकांची गैरसोय होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी केमिस्ट बांधवांना सहकार्य करावे असे आवाहन एरंडोल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सतीश पाटील व जिल्हा प्रतिनिधी कैलास न्याती यांनी केले आहे. याबाबतचे निवेदन प्रशासनाला दिले जाणार असून आमच्या न्याय व हक्कासाठी आमचा हा एक दिवशीय लढा आहे अशी भूमिका इथल्या केमिस्ट असोसिएशनने घेतली असून हा बंद यशस्वी करण्यासाठी एरंडोल मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष उदय पाटील, सचिव गुणवंत पाटील, सहसचिव ललित पाटील, खजिनदार योगेश बियाणी, सदस्य मनोहर पाटील, महेश पाटील, प्रवीण शिरोडे, चेतन पाटील, अरविंद पाटील, सागर पाटील, कमलेश चौधरी, संदीप पाटील, सागर पाटील व निखिल काबरा यांच्या सह अनेक केमिस्ट बांधवांनी हा बंद यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.




