क्राईमजळगावमहाराष्ट्र

किरकोळ कारणावरून युवकांचा घरावर हल्ला.मोटरसायकलची तोडफोड.

सोळा संशयितांविरोधात गुन्हा दाखल.चार जणांना अटक.

एरंडोल-येथील गांधीपुरा भागात किरकोळ कारणावरून पंधरा ते वीस युवकांनी लाठ्याकाठ्यांनी घरावर हल्ला करून दरवाजा व मोटरसायकलची तोडफोड करून दहशत
निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते..यावेळी युवकांनी घरातील महिला व पुरुषांना मारहाण करून साहित्याची तोडफोड केली.पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व त्यांच्या
सहका-यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.पोलिसांनी चार संशयितांना अटक केली असून उर्वरित संशयित फरार झाले आहेत.सद्यस्थितीत शहरात तणावपूर्ण शांतता असून गांधीपुरा भागात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी,की काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रेमराज यशवंत पाटील व आरिफ शेख माजीद शेख यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता.शहरातील प्रमुख पदाधिका-यांनी त्यांच्यातील वाद मिटवला होता.मात्र रात्री आठ वाजेच्या सुमारास आरिफ शेख माजीद शेख यांचेसह पंधरा ते वीस
युवकांनी अचानक प्रेमराज पाटील यांच्या घरावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला करून दरवाजाची तोडफोड करून दगडफेक केली.तसेच घरातील साहित्याची व बाहेर
लावलेल्या मोटार सायकलची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.यावेळी हल्लेखोर युवकांनी घरातील,मीनाबाई लक्ष्मण पाटील,महेंद्र पाटील,माधुरी पाटील, स्वाती प्रेमराज पाटील यांना मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.याबाबत मीनाबाई लक्ष्मण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरिफ शेख माजीद शेख,मुन्ना शेख अन्वर,इरफान शेख उर्फ गोळ्या, जुम्मा (पूर्ण नाव माहित नाही),फारुख मिस्तरी,राजू पिंजारी,इम्रान उर्फ चाटी,फिरोज मिस्तरी,आसिफ शेख फावड्या,सलीम शेख मुख्तार,तौफिक मुजावर,भुरा शेख अब्दुल,अब्बास शेख अब्दुल,मोबीन युनुस शेख,अज्जू
भंगारवाले यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शंकर पवार तपास करीत आहेत. पोलिसांनी आरिफ शेख माजीद शेख,आसिफ शेख जब्बार शेख,अब्बास शेख अब्दुल शेख,इरफान शेख उर्फ गोल्या रईस शेख या चार संशयितांना अटक केली असून उर्वरित संशयित फरार झाले आहेत.गांधीपुरा भागात घरावर हल्ला
केल्याचे समजताच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड व पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाल्यामुळे पुढील अनर्थ टाळला.शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे धरणगावचे पोलीस निरीक्षक सुनील पवार,पारोळ्याचे सहाय्यक निरीक्षक योगेश महाजन यांचेसह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेवून शांतता निर्माण केली.अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते रात्रभर शहरात ठाण मांडून होते. गांधीपुरा भागात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.आज सकाळी चाळीसगाव विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले
आहे.पोलिसांनी शहरातील शांतता भंग करणा-या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.रंगारगल्ली येथील अंजनी नदीवरील
नव्या पुलावर तसेच धरणगाव चौफुली येथील उड्डाणपुलाखाली रात्री उशिरापर्यंत गटागटाने थांबणा-यां विरुद्ध देखील कारवाई करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

शहरात शांतता असून गांधीपुरा भागात घरावर हल्ला करणा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू
नये.अफवा पसरवणा-या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. -निलेश गायकवाड,पोलीस निरीक्षक एरंडोल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button