जळगावमहाराष्ट्र

हर्षल शुक्ला यांनी लॉ परीक्षा उत्तीर्ण करत मिळवले यश; विधी क्षेत्रातील परंपरा कायम

एरंडोल : शहरातील प्रतिष्ठित शुक्ला परिवारातील युवा विद्यार्थी हर्षल शुक्ला यांनी नुकतीच लॉ (विधी) परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे शुक्ला परिवारासह मित्रपरिवार आणि परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हर्षल शुक्ला हे प्रसिद्ध विधीज्ञ मोहन बी. शुक्ला यांच्या परिवारातील असून, शुक्ला कुटुंबाची अनेक वर्षांपासून विधी क्षेत्रात विशेष ओळख आहे. या परिवारातील अनेक सदस्य वकिली व्यवसायात कार्यरत असून न्यायव्यवस्था आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
अशा प्रतिष्ठित परंपरेला पुढे नेत हर्षल शुक्ला यांनी देखील कायद्याच्या शिक्षणात यश संपादन करून परिवाराची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या या यशामुळे शुक्ला परिवारात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्रमंडळी तसेच विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्याच्या यशाबद्दल त्याच्या विद्यापीठाचे  डीन डॉ. पगारे , प्राचार्य बिराजदार , प्रा.  लोहार डॉ .के एम पाटील ,  प्रा सी. एस. पाटील ,  डॉ . के ए बोहरी  , डॉ श्रीपाल सबनीस , माजी नगराध्यक्ष रमेश परदेशीं कार्यकारी संचालक राजेंद्र शुक्ला यांनी अभिनंदन केले
    हर्षल यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत असून ते भविष्यात विधी क्षेत्रात मोठे यश संपादन करतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button