जळगावमहाराष्ट्र

उत्राण गुजर हद्द येथे वाळूच्या ट्रकसह ट्रॅक्टर जप्त.

एरंडोल- येथील उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड,तहसीलदार गोपाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचा-यांच्या पथकाने उत्राण गुजर हद्द परिसरात वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणा-या ट्रकसह ट्रॅक्टर जप्त केल्यामुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.वाळूची अवैध मार्गाने वाहतूक
करणा-यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा तहसीलदार गोपाल पाटील यांनी दिला आहे.तालुक्यात वाळू व मुरुमाची चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्यामुळे तहसीलदार गोपाल पाटील यांनी महसूल कर्मचा-यांचे फिरते पथक स्थापन केले असून अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांविरोधात कारवाई सुरु केली आहे.उत्राण गुजर हद्द परिसरात निवासी
नायब तहसीलदार संजय घुले, मंडळ अधिकारी संजय साळुंखे,तलाठी गजानन बहुरे,रविराज पाटील,आकाश महाजन,संदीप पाटील व महसूल पथकाचे कर्मचारी गस्त
घालत असतांना सोळा टायर मोठी ट्रक व ट्रॅक्टर वाळूने भरलेले आढळून आले.महसूल पथकाने ट्रक व ट्रॅक्टर ताब्यात घेवून तहसीलदार कार्यालयात जमा केला. तहसीलदार गोपाल पाटील यांचेसह महसूल कर्मचा-यांनी
वाळूमाफियां विरोधात कारवाई केल्यामुळे खळबळ उडाली आहे.वाळू माफियांकडून मध्यरात्री बारा वाजेपासून पहाटे सहा वाजेपर्यंत वाळूची वाहतूक केली जाते.तालुक्यात अनेक दिवसांपासून अवैध वाळू वाहतुकीच्या प्रमाणात वाढ
झाली असून प्रशासाने याबाबत कडक कारवाई करण्याची गरज आहे.वाळूसह मुरुमाची दररोज रात्री मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्यामुळे शासनाचे लाखो
रुपयांचे नुकसान होत आहे. पद्मालय,उमरदे,विखरण परिसरातून आठ ते दहा ट्रॅक्टर द्वारे मुरुमाची वाहतूक केली
जाते. उत्राण,हनमंतखेडा,कढोली,टाकरखेडा यासह गिरणा नदी पात्रातून वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.महसूल पथकाने वाळू माफियांविरोधात कारवाई सुरु केली असून मुरुमाची वाहतूक करणा-यांविरोधात देखील कारवाई करण्याची गरज आहे.अवजड वाहनातून वाळूची वाहतूक केली जात असल्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून ठिकठीकाणी मोठे खड्डे
पडले आहेत.तहसीलदार गोपाल पाटील यांनी वाळू माफियांविरोधात सुरु केलेल्या कारवाईचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात येत असून आगामी काळात देखील
कारावी सुरूच ठेवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कारवाई सुरूच राहणार-गोपाल पाटील,तहसीलदार एरंडोल.

तालुक्यात वाळू,मुरुमासह गौणखनिजाची चोरट्या म्रार्गाने वाहतूककरणा-यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल.वाळूमाफियांविरुद्ध सुरु असलेली
कारवाई यापुढेही सुरूच राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button