जळगावमहाराष्ट्र

एस.टी.कनिष्ठ वर्ग बहुहिताय संघ, महाराष्ट्र राज्य व‌ सन २००९ न्यायप्रविष्ठ बॅच च्या सभासदांचे सन २०२६-२०२७ वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार..,

एस.टी.कनिष्ठ वर्ग बहुहिताय संघ, महाराष्ट्र राज्य व‌ सन २००९ न्यायप्रविष्ठ बॅच च्या सभासदांचे सन २०२६-२०२७ वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहाने छञपती संभाजीनगर येथील कामगार भवन येथे पार पडली.

    सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल अवसरमोल साहेब तसेच प्रमुख अतिथी म्हणून दामोदर पगारे साहेब यांची उपस्थिती प्रार्थनीय होती. सदर बैठकीस राज्यभरातुन आलेल्या सभासदांपैकी जळगाव विभाग येथुन एरंडोल आगाराचे किशोर मोराणकर ,साक्री आगाराचे सचिन गाडे, कोल्हापूर येथील संदिपभाऊ कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले त्यावर सन्मानीय प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.सदर वार्षिक सभा मोठ्या उत्साहाने व प्रश्नमंजुषे मध्ये पार पडली.

यावेळी बहुतेक कर्मचारी यांनी केस संदर्भातील आपल्या मनातील काही प्रश्न शंका वकील महोदय यांना विचारले असता त्यांचे कडून विस्तृतपणे व समर्पकपणे मार्गदर्शन करण्यात आले महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातुन विभागातुन उदा.सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी,अकोला,बीड, सोलापूर, धुळे,नाशिक,पुणे, जळगाव तसेच छञपती संभाजीनगर, धाराशिव, अश्या अनेक विभागातुन आलेल्या कर्मचारींची उपस्थिती ही शोभा वाढविणारी ठरली.छञपती संभाजीनगर व चिखलठाणा येथील कर्मचारींनी उत्तम असे नियोजन करत कार्यक्रम द्विगुणित केला.आज पर्यंत केलेल्या कामाचा आढावा,तसेच मुळ प्रश्न सन २००९ बॅच वर सन २००८-२०१२ करार झाला त्या करारातही संबंधित कर्मचारी पटलावर असल्यावर ही त्यांना भेदभाव करत इतर कर्मचार्यांना १०३.५% प्रमाणे पगार वाढ करत दिले माञ सन २००९ बॅच च्या कर्मचार्यांना २९.५% ववगळत ७४% टक्याप्रमाणे अदा करुन अन्याय करण्यात आला. तसेच त्याची पुनरावृत्ती सन २०१२-२०१६ अनिश्चित व कट ऑफ डेट ची अट घालत संबंधित सन २००९ बॅच च्या कर्मचारींना झालेल्या करारानुसार निच्छित झालेल्या बेसिक (४३५०/-₹) वर मुळ वेतनात १३% वाढ देणे अनिवार्य असतांना अनिश्चित (३९५०/-₹) मुळ वेतन ठरवत त्यावर वाढ देत (४३५०/-₹+ एक इंक्रिमेंट) देत ४४६४/-₹ देत अपार नुकसान करण्यात आले आणी त्याच पार्श्वभूमीवर सन २०११ व सन २०१२ मध्ये भरती झालेल्या कर्मचारी यांचे सदर करारात ते पटलावर असल्यामुळे ४३५०/-₹ रुपये नुसार निश्चित करण्यात आल्यामुळे संबंधित कर्मचारींना सेवा ज्येष्ठतेनिहाय व भविष्यात होणार्या प्रत्येक करारानुसार झालेल्या अनपेक्षित निर्णयामुळे सन 2009 मध्ये भरती झालेल्या कर्मचारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असुन ह्या सर्व प्रकरणा बाबत सर्व प्रशासन व राज्यकर्ते जाणुन असुन त्यावर अद्याप कुठला ही तोडगा व न्याय झाला नसुन सन २००९ न्यायप्रविष्ठ बॅच च्या कर्मचारींना शेवटची आशा ही भरतीय संविधान व न्यायप्रणालीवर असुन न्यायमंदिरातच आता न्याय होईल अशी अपेक्षा वजा खात्रीची भावना झाल्याने छञपती संभाजीनगर येथे टाकलेल्या रिट पिटीशियन कडे सर्व कर्मचारींचे लक्ष लागले आहे.कर्मचारीं न्याय हक्कासाठी ते एकवटले असुन एस.टी.कनिष्ठ वर्ग बहुहिताय संघ, महाराष्ट्र राज्य मार्फत त्यांना न्याय‌ मिळवुन देण्यासाठी विधीतज्ञ  पगारे साहेब व विधीतज्ञ अवसमोल साहेब पाहत आहे.

      कार्यक्रमाचे सुञसंचालन संघटनेचे सरचिटणीस शसचिनभाऊ गाडे यांनी केले व आभारप्रदर्शन संघटनेचे अध्यक्ष विजय नानकर यांनी करत कार्यक्रम क्रमाची सांगता केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button