ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त कासोदा ईदगाह परिसरात वृक्षारोपण

मगन चौधरी यांनी दिला वृक्षरोपणातून सामाजिक सलोख्याच्या संदेश
प्रतिनिधी एरंडोल -ईद-ए-मिलादुन्नबीच्या पवित्र दिनाचे औचित्य साधून कासोदा येथील ईदगाह परिसरात मोटरसायकल मेकॅनिक मगन चौधरी यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनासोबतच समाजाला शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला.
“ईद-ए-मिलादुन्नबीचा खरा संदेश म्हणजे ‘ इस्लाम हा शांततेचा आणि मानवतेचा पैगाम देणारा धर्म आहे.” पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या शिकवणीत प्रेम, दया, बंधुभाव, गरजूंना मदत आणि सर्वांशी शांततेने वागण्याला विशेष महत्त्व आहे. त्याच विचारातून वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला
पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे हा मानवतेच्या सेवेतला महत्त्वाचा उपक्रम आहे. ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
ईद-ए-मिलादुन्नबीचा संदेश — शांतता, प्रेम, बंधुभाव आणि मानवता; तसेच हिरवाईचे संवर्धन हाच समाजासाठी प्रेरणादायी संदेश ठरला.





