जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

भूमी अभिलेख कार्यालयातील विलंबाबाबत काँग्रेसचे निवेदन

एरंडोल : तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांना विविध शासकीय सेवा व कागदपत्रे मिळविताना येणाऱ्या अडचणींबाबत एरंडोल तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालय, एरंडोल यांना निवेदन देण्यात आले.

नागरिकांकडून विविध नकलांचे अर्ज, वारस नोंद, ऑनलाइन अर्ज, नोंदणीकृत दस्तांच्या आधारे होणारे फेरफार तसेच प्रॉपर्टी कार्डवरील नाव नोंदणीसाठी अर्ज केले जातात. मात्र, या प्रक्रियेत अनावश्यक विलंब होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. काही अर्ज गहाळ होणे, वारंवार ऑनलाइन अर्ज करण्यास भाग पाडणे, अनधिकृत अतिरिक्त शुल्काची मागणी करणे तसेच रजिस्टर पाकीट व तिकिटांची मागणी करणे, अशा प्रकारांबाबतही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

या सर्व प्रकारांची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी तसेच नागरिकांना पारदर्शक पद्धतीने आणि शासनाने निश्चित केलेल्या विहित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य उपाध्यक्ष, ओबीसी विभाग विजय महाजन, तालुकाध्यक्ष सुनील पाटील, शहराध्यक्ष संजय भदाणे, सागर पाटील, सुदर्शन महाजन, अॅड. हिम्मतराव पाटील, जिल्हा सचिव जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी राजेंद्र पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील, महिला अध्यक्ष प्रतिभाताई पाटील, तालुका उपाध्यक्ष अब्दुल हक देशमुख, खजिनदार मदनलाल दामोदर भावसार, कमर अली दादा सय्यद, शेख सांडू, डॉ. प्रशांत पाटील, तालुका उपाध्यक्ष नारायण मोरे, सुरेश कौतिक पवार, मधुकर धनराज पाटील, तालुका सरचिटणीस शेख अनिस शेख रहीम आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button