जळगावमहाराष्ट्र

बालदिनानिमित्त ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ चित्रपट प्रदर्शन

प्रतिनिधी जळगाव – आज बालदिनाचे औचित्य साधून शहरातील श्री स्वामी समर्थ विद्यालय, आव्हाने शिवार, जळगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ‘पुन्हा शिवाजी राजे भोसले’ हा चित्रपट दाखविण्यात आला.
हा उपक्रम आमदार सुरेश भोळे (राजूमामा) व श्री स्वामी समर्थ विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, नेतृत्वगुण व संस्कारमूल्यांवर आधारित हा चित्रपट पाहून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शौर्य आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाबद्दल उत्साह निर्माण झाला.
या वेळी श्री स्वामी समर्थ संस्थेचे अध्यक्ष मा. मनोज पाटील सर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षाली पाटील मॅडम, तसेच सर्व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
शाळेच्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून अशा प्रेरणादायी कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळत आहे, असे मत व्यक्त केले.
बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व ऐतिहासिक मूल्यांची ओळख करून देण्याचा हा उपक्रम सर्वांनाच भावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button