महात्मा फुले पुण्यतिथी निमित्ताने केले अभिवादन.

प्रतिनिधी – एरंडोल येथील महात्मा फुले चौकात महात्मा फुले पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रम प्रसंगी प्रथम मान्यवरांचे हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर निवृत्त तहसीलदार अरुण माळी यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत महात्मा फुले यांचा जिवनपट फोटो एरंडोल, धरणगाव , पारोळा, चोपडा , अमळनेर, पाचोरा , भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांना प्रदान करण्यात आले.त्यानंतर सत्यशोधक समाज दिनदर्शिका २०२६ चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी पी.जी.चौधरी, कैलास महाजन यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष देविदास महाजन, पारोळा येथील माळी समाज अध्यक्ष रमेश माळी, धरणगाव येथील जळगाव जिल्हा सत्यशोधक समाज अध्यक्ष पी.डी.पाटील,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,माजी नगराध्यक्षा शोभाताई महाजन यांनी महात्मा फुले यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर कवि निंबा बडगुजर यांनी महात्मा फुलेंचा पोवाडा सादर केला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पी.जी.चौधरी यांनी केले.सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन,सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन, मा.विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन, दुर्गादास महाजन, सत्यशोधक समाज तालुका प्रमुख शिवदास महाजन, प्रल्हाद महाजन, सुरेश देशमुख, योगेश देवरे, गजानन महाजन , रूपेश माळी, राजू महाजन, कुणाल महाजन,मयुर महाजन, कमलेश महाजन , गणेश महाजन, सचिन महाजन, जाधव,डी.एस.पाटील, कैलास महाजन,अनिल महाजन,संजय महाजन , विनायक कुलकर्णी,रविंद्र लाळगे, सुदर्शन महाजन, दिलीप महाजन, समाधान महाजन, दिगंबर बोरसे व माळी समाज बांधव उपस्थित होते.




