जळगावमहाराष्ट्रराजकारण

एरंडोल येथे अपक्ष नगरसेवक रविंद्र महाजन यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश.


एरंडोल | प्रतिनिधी
एरंडोल नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक १ मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले नगरसेवक रवींद्र संतोष महाजन यांनी आमदार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे नगरपरिषदेत शिवसेना पुरस्कृत नगरसेवकांची संख्या अधिक बळकट झाली आहे.
शिवसेनेत प्रवेशप्रसंगी आमदार अमोल पाटील यांनी रवींद्र महाजन यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी नगरपरिषद गटनेते प्रा. मनोज पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १ च्या सर्वांगीण विकासासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देता यावा, या उद्देशाने रवींद्र महाजन यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
यावेळी नगरसेवक अनिल महाजन, रुपेश माळी, कृष्णा ओतारी, सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, तसेच अमोल तांबोळी, अतुल मराठे, मयूर महाजन, गोपाळ पाटील, दीपक पाटील, बबलू चौधरी, महेश देवरे, अल्ताफ पठाण, आशिर्वाद पाटील, संतोष महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार अमोल पाटील यांनी, “प्रभाग क्रमांक १ च्या सर्वांगीण विकासासह शहरातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून भक्कम सहकार्य केले जाईल,” असे ठोस आश्वासन दिले. रवींद्र महाजन यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून आगामी काळात विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button