अपघातजळगावमहाराष्ट्र
एरंडोल शिवारात ७९ वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला, मृत्यूचे कारण अस्पष्ट………..!

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील निपाणे येथील महारू महादू हटकर (वय ७९ वर्षे ) या वृद्धाचा मृतदेह शनिवारी ११ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेपुर्वी तिवारी बंगला परिसरातील एका शेतात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मयताचे भाऊ भागवत हटकर यांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक दत्तात्रय ठाकरे पुढील तपास करत आहेत.





