जळगावमहाराष्ट्रराज्य

पाळधी येथे लोकनियुक्त नगराध्यक्षांचा भव्य सत्कार

प्रतिनिधी एरंडोल – शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल पाळधी येथील नोबेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. डॉ. अर्चना सूर्यवंशी व  प्रशांत सूर्यवंशी यांच्या सूर्या फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी नगराध्यक्षांना सन्मानपत्र प्रदान करून विशेष गौरव करण्यात आला. शहराच्या विकासासाठी तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दीपमाला काळे, मनोज चोधरी, डॉ. राधेश्याम चोधरी,  मनोज पाटील, शिक्षणाधिकारी  निलेश पाटील तसेच रील स्टार निकिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या मनोगतात नगराध्यक्षांच्या कार्याचा गौरव करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले. या सन्मानाबद्दल नगराध्यक्षांनी प्रा. डॉ. अर्चना सूर्यवंशी व सूर्या फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button