आरोग्यदायी धावण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न

एरंडोल :-सालाबादाप्रमाणे एरंडोल शहरात मैत्री सेवा फाउंडेशन, बालाजी उद्योग समूह, त्रिवेदी फाउंडेशन यांच्या संयुक्त एरंडोल रन मॅरेथॉन वर्ष द्वितीय धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन ११ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता टेनिस क्लब पासून स्पर्धा सुरू झाल्या.
एरंडोल शहरात आयोजित केलेली धावण्याची स्पर्धा जी आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि स्थानिक समुदायाला एकत्र आणण्यासाठी ‘एक तास आरोग्यासाठी’ या संकल्पनेखाली आयोजित केली जाते, ज्यामध्ये नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने भाग घेतात यावर्षी जवळपास १८०० स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर नरेंद्र ठाकूर, शिवसेना गटनेता नगरसेवक प्रा. मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ता आनंद दाभाडे, एडवोकेट ओम त्रिवेदी, प्रसाद काबरे, डॉ नरेंद्र डी.पाटील, डॉ. फराहज बोहरी, डॉ. सुरेश पाटील,माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, नगरसेविका छाया दाभाडे यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका, मैत्री संघ फाउंडेशनचे पदाधिकारी या मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
स्पर्धेमध्ये ३६ वर्ष (पुरुष) वयोगटात
प्रथम क्रमांक अमर महाजन द्वितीय विठ्ठल मराठे, तृतीय निलेश बाहेती तर महिला गटात
प्रथम क्रमांक डॉ. जमुना बोहरी, द्वितीय उर्मिला पाटील तर तृतीय क्रमांक नगरसेविका छाया दाभाडे.
१७ते३६ वर्ष (मुली) गटात
प्रथम पायल पवार, द्वितीय लक्ष्मी अनिल महाजन, तृतीय पूजा संभाजी पाटील
(मुलांमध्ये) प्रशांत जाधव प्रथम तेजस मगन ठाकूर द्वितीय मोहित महाजन तृतीय
१०ते १६ वर्ष (मुली) गटात
प्रथम जानवी रोझात, द्वितीय मेघना पाटील द्वितीय हर्षदा पवार तर मुलांमध्ये सनी कोळी प्रथम, ओम पाटील दृतिय, प्रथमेश जगताप तृतीय क्रमांक
एरंडोल रन मॅरेथॉन च्या यशस्वीतेसाठी मैत्री सेवा फाउंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.




