माझ्या जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा – डॉ.नरेंद्र ठाकुर,लोकनियुक्त नगराध्यक्ष

प्रतिनिधी – एरंडोल नगर परिषद नगराध्यक्ष पदासाठी नगराध्यक्ष म्हणून माझ्या जडणघडणीत पत्रकारांचा मोठा वाटा असल्याचे एरंडोल नगर परिषदचे नवनियुक्त लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकुर यांनी पत्रकार दिनी आयोजित पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी अमोल बागुल हे उपस्थित होते.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून एरंडोल नगर परिषदेतर्फे शहरातील पत्रकारांचा सत्कार नगर परिषदेच्या सभागृहात पार पडला.सुरुवातीला लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकुर,मुख्याधिकारी अमोल बागुल व ज्येष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी यांच्या हस्ते दर्पण कार बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यानंतर उपस्थित पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी आताच्या युगात बातमीच्या खोलात जाण्याची प्रक्रिया दूर झाली असल्याची खंत व्यक्त केली.उपस्थित पत्रकारांचा पेन,डायरी व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बी.एस.चौधरी,आल्हाद जोशी, कमरअली सैय्यद,रतीलाल पाटील,कैलास महाजन,प्रा.सुधीर शिरसाठ, नितीन ठक्कर,राजधर महाजन,उमेश महाजन, प्रमोद चौधरी,शैलेश चौधरी,पंकज महाजन,नितीन पाटील, विज्ञान पाटील,कुंदन ठाकुर,प्रकाश शिरोडे,प्रविण महाजन, दिपक बाविस्कर,शरद महाजन,तुषार शिंपी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी,सूत्रसंचलन हितेश जोगी यांनी तर आभार एस.आर. ठाकुर यांनी मानले.




