जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथे स्वातंत्र्यदिनी “स्वच्छता दूत” व “अग्निवीर” कर्मचाऱ्यांच्या गौरव !

एरंडोल – येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त मानव सेवा बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने आयोजित विशेष सन्मान सोहळ्यात शहराची स्वच्छता व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या स्वच्छता दूत व अग्निशामक दलाच्या साहसी व धाडसी कार्याचा उत्कृष्ट आणि निष्ठावान सेवा बजावणाऱ्या स्वच्छता दूत व अग्निशामक दल अग्निवीरांचा ” शाल व सन्मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात अँड मोहन शुक्ला होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी मनिषकुमार गायकवाड , मुख्याधिकारी अमोल बागुल, नगराध्यक्ष डॉ नरेंद्र ठाकुर, मा.जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन, न.पा चे लेखापालक डॉ शरद राजपुत, संस्थेचे सचिव तथा दलितमित्र फकिरा खोकरे,कामगार सफाई कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष नागेज कंडारे, उपानगरध्यक्ष कृष्णा भाऊ ओतारी,माजी नगरसेवक विजय अण्णा महाजन, दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान सांगवीचे अध्यक्ष प्रदिप आप्पा पाटील, कविवर्य अँड विलास मोरे, स्वच्छता निरीक्षक जिवन जाधव,दादाजी धुनिवाले प्रतिष्ठान विश्वस्त छोटू भाऊ बडगुजर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविक करताना संस्थापक अध्यक्ष तथा आरोग्य दूत युवराज उर्फ विक्की खोकरे यांनी सत्कार सोहळा चा उद्देश व मानव सेवा बहुउद्देशी संस्थेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली.विक्की खोकरे व त्यांची मानव सेवा संस्था करीत असलेल्या अथक सामाजिक सेवा व वसा यांचा समाजातील लोकांनी आदर्श घ्यावा असे प्रतिपादन प्रख्यात व जेष्ठ विधीतज्ञ अँड मोहन बी शुक्ला यांनी केले.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण साळी,सचिव फकिरा खोकरे, खजिनदार रविंद्र कलोसे,सह सचिव किरणबाई खोकरे, कार्यकारी संचालक दिपक चावरिया,नितिन खोकरे, दुर्गेश खोकरे,रितीक खोकरे,कविता खोकरे,सुनिल महाले,भुषण चौधरी, कुणाल पाटील, अमिन मुजावर आदींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन नितिन खोकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय पाटील यांनी मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button