एरंडोल महाविद्यालयाचा एच एच सी चा निकाल ६४.६५ टक्के, टक्केवारी कमालीची घसरण…

प्रतिनिधी एरंडोल – येथील दादासाो. दि. शं. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाचा इ. 12 वीचा निकाल काल जाहीर झाला असून विज्ञान शाखेतून यज्ञेश सुधीर पाटील (७८.६७ टक्के) प्रथम, वाणिज्य शाखेतून यामिनी अतुल कुंदप (७४ टक्के) प्रथम तर कला शाखेतून रेणुका संजय गायकवाड (७५ टक्के) प्रथम आली आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ६४.६५ टक्के लागला असून
मागील वर्षी ९५ टक्के झट लागला होता. यावर्षी ३० टक्क्यांनी निकालामध्ये घसरण झाल्याचे दिसून येते.
यावर्षी एकूण ८५६ प्रविष्ट विद्यार्थी होते. त्यापैकी ५४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर ३०८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
किमान कौशल्य विभागाचा ऑटो इंजिनिअरिंग या शाखेचा दहा विद्यार्थ्यांपैकी फक्त एक विद्यार्थी पास झाला.
महाविद्यालयातील कला शाखेतून १७७ विद्यार्थी परिक्षेस बसे होते. त्यातून ४७ उत्तीर्ण तर १३० विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेतून ८९ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातील ५१ उत्तीर्ण तर ३८ अनुत्तीर्ण झाले आहेत.
विज्ञान शाखेतून एकूण ५८० विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यातील ४४८ विद्यार्थी उत्तीर्ण, १३१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
किमान कौशल्य
(ऑटो इंजिनिअरींग) १० विद्यार्थी परिक्षे स बसले होते.१ विद्यार्थी उत्तीर्ण झाला ९ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य डॉ ए जे पाटील, डॉ.अरविंद बडगुजर , उप प्राचार्य एन बी गायकवाड, पर्यवेक्षक व्ही. एस वाघ यांनी अभिनंदन केले आहे.




