कै. सेठ रामनाथ हिरालाल जाजू यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण संपन्न.

प्रतिनिधी – एरंडोल येथील कै. सेठ रामनाथ हिरालाल जाजू यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील राहि जाजू प्राथमिक विद्यामंदिर, एरंडोल येथे शैक्षणिक गुणवत्ता प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व तुकड्यांमधून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मातोश्री कै. नर्मदाबाई रामनाथ जाजू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाजू परिवारातील सदस्यांनी शाळेत उपस्थित राहून कै. सेठ रामनाथ हिरालाल जाजू यांच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच शाळा समितीचे अध्यक्ष जगदीश बिनी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यानंतर जाजू परिवार यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने गेल्या तब्बल बेचाळीस वर्षांपासून जाजू परिवार दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबवत आहे. या उपक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस व खाऊ वाटप करण्यात येते, ही परंपरा पुढेही अखंडपणे सुरू ठेवण्याचा निर्धार जाजू परिवाराने व्यक्त केला.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच रा.ती.काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील राठी, ज्येष्ठ प्रा. शिवाजीराव अहिरराव,रविंद्र पाटील, श्याम जाजू तसेच विद्यार्थ्यांचे पालक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कल्पेश भक्कड यांनी केले. शाळेच्या वतीने जाजू परिवाराचे आभार मानण्यात आले.




