“श्रीमती के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल येथे योग शिबिराचे उद्घाटन”

प्रतिनिधी – दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी दादासाहेब दि शं पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल व मुळजी जेठा महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने श्रीमती के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये निशुल्क योग शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी संस्थाध्यक्ष दादासाहेब अमित पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले व आपल्या मनोगतातून सांगितले की योग साधना अत्यंत प्राचीन विद्या आहे आणि त्याचा उगम भारतात झालेला आहे. नियमित योगाभ्यासाने विद्यार्थ्यांची एकाग्रता क्षमता वाढते व शरीर सुदृढ होते. त्याचप्रमाणे एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतल्याबद्दल योग प्रशिक्षिका आणि संपूर्ण स्टाफ चे अभिनंदन केले . कार्यक्रमाचे उद्घाटक मूळज जेठ महाविद्यालयाचे सोहम डिपार्टमेंट योग अँड नॅचरोपॅथी विभागाचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी आपल्या उद्घाटनपर संबोधनातून योगाची आवश्यकता,गरज आणि महत्व पटवून दिले. आपले जीवन अधिक आरोग्यमय सुखकर आणि आनंददायी करण्यासाठी आपण प्राणायाम व ध्यानधारणेला अंगिकारला हवे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जे. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की योगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होत असतो. चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचा निश्चितच लाभ होईल असे प्रतिपादन त्यांनी केले. महाविद्यालयाची उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर व के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य दिनानाथ पाटील यांनी पंधरा दिवस चालणाऱ्या नि:शुल्क योग शिबिरास मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती शेलार यांनी आणि सूत्रसंचालन सविता पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन किरण महाजन यांनी केले. या योग शिबिरास योग प्रशिक्षिका स्वाती शेलार व सविता पाटील मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शितल पाटील, शेखर पाटील स्वाती पाटील गणेश पाटील माधुरी सोनवणे प्रीती बियाणी निशिता पेंढारकर गुंजन जाधव यांनी विशेष सहकार्य केले.





