जळगावमहाराष्ट्र

आदर्श आचारसंहिताचे पालन व निवडणूक संदर्भात आढावा बैठक.

प्रतिनिधी – एरंडोल येथे नगरपालिका सभागृहात आदर्श आचार संहिताचे पालन व निवडणूक संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील तथा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी मुख्याधिकारी सुद्धा हजर होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागू करण्यात आलेला असल्याने निवडणुका या निर्भय मुक्त व पारदर्शक होणे कामी या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार प्रदिप पाटील व मुख्याधिकारी अमोल बागुल उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील यांनी उमेदवारांनी फॉर्म भरताना काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली. उमेदवाराने संगणकीय प्रणाली द्वारे स्वतःची नोंदणी करून नामनिर्देशन पत्र तसेच शपथ पत्र भरावे त्यासोबत मत्ता व दायित्व घोषणापत्र नोटरी करून आवश्यक त्या सर्व ठिकाणी स्वाक्षरीसह विहित वेळेत वेळेत व विहित पद्धतीने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावे. उमेदवाराने राष्ट्रीयकृत बँकेत निवडणुकीसाठी नवीन बँक खाते उघडण्याची व निवडणुकीसाठी लागणारा खर्च हे नवीन खात्यातूनच करावे असे सांगितले. निवडणुकीसाठी नामनिर्देशक पत्रासोबत जोडण्यात आलेल्या शपथपत्रात कोणतीही माहिती अपूर्ण ठेवू नये अन्यथा अपूर्ण किंवा रिक्त शपथपत्रामुळे नामनिर्देशन पत्र नाकारले जाऊ शकते.
याप्रसंगी उपस्थित भावी उमेदवारांनी आपल्या शंका उपस्थित केले असता निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप पाटील यांनी त्यांच्या शंकेचे निरसन करून योग्य ते सहकार्य करण्याचे सांगितले.
या वेळी गोरख चौधरी,प्रा.आर.एस.पाटील , विशाल सोनार ,शे.सांडू शेख,ॲड.नयन आरखे,राजेंद्र चौधरी व पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button