जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

प्रतिनिधी – शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथील प्रथम वर्ष बी. फार्मसी व डी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी बुधवार, दि. 14 जानेवारी 2026 रोजी शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, होलसेल मेडिसिन डिस्ट्रीब्यूटर व पॅथोलॉजी लॅबोरेटरी, एरंडोल येथे अभ्यासभेट दिली.

      या भेटीचा मुख्य उद्देश ग्रामीण रुग्णालयातील विविध विभागांना भेट देऊन त्यांची कार्यपद्धती प्रत्यक्ष जाणून घेणे हा होता. ग्रामीण रुग्णालयात विद्यार्थ्यांना बाह्यरुग्ण विभाग, अंतर्गत रुग्ण विभाग, औषध वितरण विभाग व शल्यचिकित्सा विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली. या विभागांचे कार्य व मार्गदर्शन वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक जाधव  यांनी केले. रुग्णालयातील इतर विभागांची कार्यपद्धती तसेच रुग्णांना औषधांचे वितरण कशा प्रकारे केले जाते, याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.

  यानंतर डॉ. मुकेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजारांबाबत माहिती देऊन त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

तसेच राजमुद्रा होलसेल मेडिसिन डिस्ट्रीब्यूटरचे संचालक  सतीश पाटील यांनी होलसेल मेडिसिन कशा पद्धतीने रिटेल मेडिकल व्यावसायिकांपर्यंत पोहोचवले जाते, त्यामधील मार्जिन कसे ठरते तसेच औषधांची अल्फाबेटिकली किंवा कंपनीनुसार मांडणी कशी केली जाते, याबाबत माहिती दिली.

    ह्युमन केअर डायग्नोस्टिकचे संचालक डॉ. रोहित ठाकूर  यांनी रक्त, लघवी तसेच इतर पथोलॉजी तपासण्यांचे अहवाल रोगनिदानासाठी किती महत्त्वाचे असतात, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच नितीशा मेडिकलचे संचालक   हितेश कापडणे यांनी किरकोळ औषध विक्री व्यवसायाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या शैक्षणिक भेटीसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्राचार्य डॉ. विजय शास्त्री तसेच संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भेटीच्या आयोजनासाठी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी व प्रा. जावेद शेख यांनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. करण पावरा, प्रा. गायत्री सूर्यवंशी व प्रा. योगेश्वरी लोहार यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button