पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे ज्येष्ठ महिलां चा वाढदिवस व लग्न दिवस साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी – आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्येष्ठ महिलांना सुध्दा आपला वाढदिवस किंवा लग्न दिवस साजरा व्हावा असे वाटत असले तरी त्या विषयी ते वाच्यता केल्यास घरात काय म्हणतील या विषयी बोलत नाही या गोष्टीची जाणीव ठेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ महिला संघातर्फे ज्येष्ठ ज्या महिला सदस्यांच्या लग्नाला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच ज्यांचे वाढदिवस जानेवारी महिन्यात आहेत त्यांचा सत्कार केला हा कार्यक्रम दि.३०/०१/२६, वार शुक्रवार रोजी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकूर ह्या होत्या. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष सुनिता माळी उपस्थित होत्या. या प्रसंगी एरंडोल शहरातील विविध महिला मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कार प्राप्त महिलांचे ज्येष्ठ महिलांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकूर यांनी ज्येष्ठ महिलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन करताना ४० वर्षानंतर शरीरातील होणारे बदल हे शारीरिक , मानसिक , सामाजिक असून त्या वेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी, कुठली पथ्ये पाळली पाहिजे जेणेकरून आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होईल या बद्दल सविस्तर माहिती दिली.
या प्रसंगी अनेक महिला मंडळाच्या सदस्यांनी ज्या ज्येष्ठ महिला नसून तरी ज्येष्ठ महिलांना मदतीचा हात देऊन त्यांना मदत करीत होत्या. सर्व ज्येष्ठ महिलांनी नारंगी रंगाचा ड्रेस परिधान केला असल्याने आकर्षणाचा विषय ठरला होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा साळी यांनी केले. सुत्र संचालन
शशिकला पांडे यांनी तर आभार नंदा शुक्ला यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी चंद्रकला जैन , इंदिरा पाटील , शकुंतला अहिरारव, उज्वला राठी , कोठावदे मॅडम , उषा खैरनार व इतर महिला सदस्यांनी प्रयत्न केले.




