जळगावमहाराष्ट्र

*पुणे विद्यापीठात ‘ म्युझियम ऑफ कार्टून आर्ट ‘ चा चौथा वर्धापन दिन संपन्न, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा गौरव……….!*

प्रतिनिधी एरंडोल – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘ म्युझियम ऑफ कार्टून आर्ट ‘ चा चौथा वर्धापन दिन १५ मार्च २०२६ रोजी उत्साहात साजरा झाला. विद्यापीठाच्या ऐतिहासिक सरस्वती हॉलमध्ये आयोजित या सोहळ्यात देशभरातील उत्कृष्ट व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संग्रहालयाचे संस्थापक व जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरज ‘ एस्के ‘ श्रीराम यांनी भूषवले. तर प्रमुख अतिथी म्हणून मिक्स मिडीयाचे संस्थापक प्रद्युम्न माहेश्वरी व ‘ राह ‘ कल्चरल सेंटरच्या आयमन मेहता हे होते.यावेळी एरंडोल येथील ‘ मार्मिक ‘ व ‘ दैनिक महाराष्ट्र सारथी ‘ चे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शरद महाजन यांचा त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल विशेष गौरव करण्यात आला. सोबतच घनश्याम देशमुख, लहु काळे, शरयु फरकांडे,अतुल पुरंदरे,विश्वास सुर्यवंशी, योगेंद्र भगत, आशिष विखार, गौतम दिवार, विवेक मगर,दिपाली जोशी,यांच्यासह अनेक नामवंत कलाकारांना ‘ मोमेन्टो ‘ देऊन सन्मानित करण्यात आले.
           याप्रसंगी ” व्यंगचित्र म्हणजे समाजाचा आरसा आणि सारासार विवेक आहे,” असे प्रतिपादन ‘ मिक्स मिडीया ‘ चे संस्थापक प्रद्युम्न माहेश्वरी यांनी केले.आयमन मेहता (राह कल्चरल सेंटर) यांनीही यावेळी आपले विचार मांडले.
         समकालीन राजकारण आणि समाजकारणावर भाष्य करणाऱ्या देशभरातील गाजलेल्या व्यंगचित्रांचे भव्य प्रदर्शन यावेळी रसिकांचे केंद्रबिंदू ठरले. ” व्यंगचित्र म्हणजे समाजाचा आरसा आणि सारासार विवेक आहे,” असे प्रतिपादन ‘ मिक्स मिडीया ‘ चे संस्थापक प्रद्युम्न माहेश्वरी यांनी केले.
       संग्रहालयातील निवडक चित्रे व तज्ञ मार्गदर्शकांचे सुयोग्य मार्गदर्शन संग्रहालयात आयोजित करून परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये या कलेची आवड निर्माण करण्याचा मानस क्युरेटर डॉ. प्रिया गोहाड यांनी व्यक्त केला.
          या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संग्रहालयाचे संस्थापक व जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरज ‘ एस्के ‘ श्रीराम यांनी भूषवले. आयमन मेहता (राह कल्चरल सेंटर) आणि प्रा. माधवी रेड्डी (मीडिया विभाग प्रमुख) यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button