जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

खान्देश चे श्रावण बाळ म्हणजे प्रवीण महाजन , आईचं आयुष्यात असणं खूप मोलाचं ….. अरुण माळी निवृत्त तहसीलदार

प्रतिनिधी – आई शिवाय माणूस जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. तिचं आयुष्यात असणं खूप मोलाचं असून ती प्रत्येक कुटुंबासाठी प्रेरक शक्ती आहे असे प्रतिपादन निवृत्त तहसीलदार तथा सूर्योदय ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अरुण भाऊ माळी यांनी केले. ते येथील ऊर्जा सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे आयोजित केलेल्या  आई महोत्सवांतर्गत आदर्श आई गौरव सोहळ्याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.

        कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक रवींद्र महाजन, एरंडोल शहर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष नामदेव पाटील, संचालक गणेश बडगुजर, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक सुरेश देशमुख, संयोजक प्रवीण महाजन विचारपीठावर उपस्थित होते.

   यावेळी पती निधनानंतर कुटुंबासाठी आई बरोबरच बापाची ही भूमिका समर्थपणे निभावणाऱ्या व संघर्षातून कुटुंबाला पुढे नेणाऱ्या 83 वर्षीय माजी उपनगराध्यक्ष बानोबी गुलाब बागवान, 85 वर्षीय शांताबाई निंबा शिंपी, 78 वर्षीय दमयंती लालजी ठक्कर, विमलबाई संतोष महाजन, शशिकला गोकुळदास मानुधने, अप्रुकबाई लक्ष्मण पाटील, अनुसया सुधनवा महाजन यांचा आदर्श आई गौरव पुरस्कार देऊन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मान चिन्ह व बुके देत या माऊलींचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी नामदेव पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, आई महोत्सव हा कार्यक्रम खरोखरच प्रेरणादायी असून कुटुंबासाठी संघर्ष करत जीवन जगणाऱ्या मातांचा सन्मान होणे ही एक चांगली गोष्ट आहे. यावेळी त्यांनी माय ही कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संयोजक प्रवीण आधार महाजन यांनी तर आभार ऊर्जा संस्थेचे अध्यक्षा अंजली महाजन यांनी मानले. या कार्यक्रमास नीलिमा मानुधने, मीनाक्षी पाटील, यशोदा महाजन, शुभम महाजन, सुनंदा शिंपी, पत्रकार नितीन ठक्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कु. तेजस्विनी महाजन व कु. कल्याणी महाजन यांनी परिश्रम घेतले. शशिकला मानुधने व यशोदा महाजन यांनीही ऊर्जा संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसा केली तर सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संस्थेतर्फे अध्यक्ष अरुण भाऊ माळी यांनी ऊर्जा संस्थेच्या अध्यक्ष अंजली महाजन व प्रवीण महाजन यांचा विशेष गौरव केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button