एरंडोल केंद्रावर नीट परीक्षा सुरळीतपणे पार पडली,विद्यार्थ्यांची अनुपस्थिती मोठ्या प्रमाणात जाणवली

एरंडोल -येथील डी डी एस पी महाविद्यालयात राष्ट्रीय ‘नीट’ परीक्षा अतिशय शिस्तबद्ध व सुरळीत वातावरणात सर्व नियमांचे अंमलबजावणी करत आज २१मे २०२६ रोजी पार पडली. परीक्षा ही राष्ट्रीय- स्तरीय परीक्षा आहे. येथील परीक्षा केंद्रावर एकूण ३१२ विद्यार्थी प्रविष्ट होते. नीट परीक्षा दुसऱ्यांदा होत असल्यामुळे सदर परीक्षेसाठी एरंडोल महाविद्यालयाचा केंद्र वर अनुपस्थितीचे प्रमाण जास्त होते.परीक्षेसाठी प्रांताधिकारी मनीष कुमार गायकवाड, तहसीलदार गोपाळ पाटील, यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर परीक्षेसाठी निरीक्षक म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रा. डॉ. किशोर पवार यांनी काम पाहिले तर केंद्र संचालक म्हणून प्राचार्य डॉ. ए जे पाटील, उपप्राचार्य डॉ. अरविंद ए. बडगुजर, डॉ. नरेंद्र तायडे यांनी कामकाज पाहिले.
विद्यार्थ्यांना व पालकांच्या सोयीसाठी परीक्षा केला तर्फे डिजिटल परीक्षा केंद्र दिशादर्शक बोर्ड लावण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी एक्वा थंड पाण्याची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील होती. वाहन पार्किंग साठी स्वतंत्र जागा होती. परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही, जामर व्यवस्था देखील होती.
परीक्षा कामी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह संपूर्ण कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
सदर परीक्षेचे कामी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, यांनी सहकार्य केले.





