एरंडोल तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनील पाटील; शहराध्यक्षपदी संजय भदाणे
प्रतिनिधी एरंडोल : एरंडोल तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सुनील गोविंदा पाटील यांची फेरनिवड करण्यात आली असून शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी संजय भदाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे तालुक्यातील काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या संघटन सृजन अभियानांतर्गत प्रदेश निरीक्षक अरीज बेग मिर्झा व डॉ. अरविंद कोलते यांनी एरंडोल तालुक्याचा दौरा करून पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. त्यांच्या अहवाल व शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
सुनील पाटील यांची तालुकाध्यक्षपदी झालेली फेरनिवड आणि संजय भदाणे यांची शहराध्यक्षपदी झालेली नियुक्ती ही संघटन बळकटीसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या नियुक्त्यांचे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप पाटील, बंटी पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, महानगराध्यक्ष जमील शेख, विजय महाजन, डॉ. फरहाज बोहरी, डॉ. प्रवीण वाघ, कमर अली सय्यद यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.





