जळगावमहाराष्ट्रशेती विषयक

एरंडोल सोसायटीतर्फे २१० शेतकऱ्यांची कर्जमाफी यादी जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दिलासा
प्रतिनिधी एरंडोल- एरंडोल विविध कार्यकारी सहकारी सोसायटीतर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी कर्जमाफी यादी शनिवारी (दि. २५) माजी नगराध्यक्ष देवीदास राजाराम महाजन यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली.
संस्थेचे एकूण २४८ कर्जदार सभासद असून, त्यापैकी २१० सभासदांचा कर्जमाफी यादीत समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या निर्देशानुसार पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.
यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शासनाच्या या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. कर्जमुक्तीमुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी होऊन शेतीसाठी नव्याने बळ मिळेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी निवृत्त तहसीलदार अरुण माळी, संचालक दुर्गादास महाजन, रमेश महाजन, विजय महाजन, आय. जी. माळी, रमेश भिका महाजन, बापू पाटील, सचिव युवराज महाजन, निंबा माळी यांच्यासह सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button