एसआयआर मोहिमेत शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण; नायब तहसीलदार अमोल बन यांचा सत्कार.

प्रतिनिधी एरंडोल – एरंडोल विधानसभा मतदारसंघात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत मतदान नोंदणीचे शंभर टक्के काम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल नायब तहसीलदार तथा मतदान नोंदणी अधिकारी अमोल बन यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
अमोल बन यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांनी नियोजित वेळेत मतदार पडताळणी व नोंदणीचे शंभर टक्के काम पूर्ण केले. या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड व तहसीलदार गोपाळ पाटील यांच्या हस्ते अमोल बन यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी एरंडोल विधानसभा मतदारसंघातील सर्व सहा मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनीही अमोल बन यांचे अभिनंदन केले. मतदार यादी अद्ययावत ठेवण्याच्या प्रक्रियेत अधिकारी, कर्मचारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी केलेल्या समन्वयपूर्ण कामाचे मान्यवरांनी कौतुक केले.
लोकशाही प्रक्रियेत अचूक मतदार यादीला अनन्यसाधारण महत्त्व असून, एसआयआर मोहिमेतील ही शंभर टक्के कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमास महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.





