जळगावमहाराष्ट्र

लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती महाविद्यालयात उत्साहात


प्रतिनिधी एरंडोल :- यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १०६ व्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब अमित पाटील यांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी इतिहास विभाग प्रमुख डॉ. बालाजी पवार यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव तसेच केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व स्वातंत्र्य चळवळीला बळ दिले. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, पोवाडे, लावण्या व शाहिरीच्या माध्यमातून कष्टकरी, शोषित आणि उपेक्षित समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडत सामाजिक परिवर्तनाची प्रेरणा दिली, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर, कुलसचिव सोमनाथ बोरसे (भाऊसाहेब), डॉ. आत्माराम चिमकर, डॉ. किशोर वाघ, डॉ. नरेंद्र तायडे, डॉ. संदीप कोतकर, डॉ. नितीन दांडेकर, डॉ. हेमंत पाटील, प्रा. महेंद्र शिरसाट, प्रा. सुनील सजगणे, डॉ. राहुल पाटील, प्रा. सुरज वसावे, श्री. शेखर पाटील यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. योगेश येंडाईत यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मीना काळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सागर विसपुते यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button