अजितदादांच्या विचारांचा जागर घडविणारी ‘अजित पर्व’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न.

एरंडोल – लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंती सप्ताहानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,एरंडोल तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या वतीने आयोजित ‘अजित पर्व’ वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी उत्राण, तळई, निपाने, भातखेडे, ताडे बाम्हणे, हनुमंतखेडे, सिम, अंतुर्ली, जवखेडे व खडके येथील शाळा व महाविद्यालयांतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत सामाजिक, ऐतिहासिक, राष्ट्रनिर्माण व व्यक्तिमत्त्व विकासाशी संबंधित विषयांवर प्रभावी वक्तृत्व सादर केले. विद्यार्थ्यांच्या ओघवत्या भाषणांना उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि नागरिकांनी भरभरून दाद दिली.
बक्षीस वितरण समारंभास मुख्याधिकारी अमोल बागुल, आगारप्रमुख दिलीप महाजन,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील,राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष विजय पाटील, प्रा.भरत शिरसाट,रोहिदास पाटील, शालिग्राम पाटील, शहराध्यक्ष ॲड. ईश्वर बिऱ्हाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख डॉ.शांताराम पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष संतोष महाजन, राजु पवार,संतोष चौधरी,ज्ञानेश्वर पाटील, विकास पाटील,एन.डी.पाटील,नगरसेवक बाबू शेठ, नरुद्दीन सय्यद, जिया अहमद, रवींद्र पाटील,सचिन पाटील,किशोर पाटील श्रीधर पाटील, किशोर महाले,डॉ.नामदेव जाधव, संजय बागड,ह.भ.प.दिनेश महाराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष भागवत पाटील यांच्या संकल्पनेतून व नियोजनातून हा उपक्रम यशस्वी झाला. विद्यार्थ्यांना वक्तृत्वाचे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच अजितदादांच्या विकासाभिमुख विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश या स्पर्धेतून साध्य झाला. उपस्थित मान्यवरांनी भागवत पाटील यांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले.
सदर स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी (लहान गट) आणि इयत्ता आठवी ते दहावी (मोठा गट) अशा दोन गटांत घेण्यात आली. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय अशा तीन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
यात विजेते विद्यार्थी लहान गट प्रथम वैष्णवि निलेश पाटील 3100रुपये व पारितोषिक तळई,
द्वितीय हर्षदा मनोहर पाटील 2100रुपये व पारितोषिक
तळई,तृतीय मेघा दिलीप पाटील
1100रुपये व पारितोषिक उत्राण,
मोठा गटातून प्रथम रितिका प्रदीप पाटील 5100 रुपये व पारितोषिक
भातखेडे,द्वितीय दीक्षा नामदेव जाधव 3100 रुपये व
पारितोषिक तळई,तृतीय भाग्यश्री सचिन धनगर 2100 रुपये व पारितोषिक उत्राण,
तसेच उर्वरित विद्यार्थी ज्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला अश्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी सन्मानार्थ पारितोषिके भेट देण्यात आली
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ह.भ.प.दिनेश महाराज पाटील व प्रकाश कुवर यांनी केले. तसेच आभार राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, पालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भागवतदादा मित्रपरिवाराचे सदस्य निलेश पाटील,ऋषी पाटील,पंकज सनेर, सोनू कोळी,अनिल सोनवणे, दीपक पाटील,शुभम पाटील आदी नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.





