उत्कृष्ट अधिकारी म्हणून एरंडोलचे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचा गौरव

महसूल प्रशासनातील उत्कृष्ट कामगिरीची दखल; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान
प्रतिनिधी एरंडोल : महसूल प्रशासनांतर्गत सन २०२५-२६ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल एरंडोलचे उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचा ‘उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी’ म्हणून गौरव करण्यात आला. महसूल दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.

महसूल प्रशासनातील विविध कामकाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गायकवाड यांची उत्कृष्ट अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना प्रभावीपणे सेवा देताना त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उत्कृष्ट उपविभागीय अधिकारी म्हणून सन्मान मिळाल्याबद्दल मनीषकुमार गायकवाड यांचे एरंडोल तालुक्यातील नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.





