जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदान शिबिर; ३० रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

प्रतिनिधी एरंडोल : स्वातंत्र्यदिनानिमित्त एरंडोल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रक्तदान शिबिरात एकूण ३० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदविला. रक्तदान हे जीवनदान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व मोठे आहे.
स्वातंत्र्यदिनाच्यापार्श्वभूमीवआयोजित या उपक्रमातून समाजसेवा, बंधुभाव आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश देण्यात आला. रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग घेत
आयोजकांचे कौतुक केले.
याप्रसंगी एरंडोल तालुका अध्यक्ष शेख शाकीर सर ,एरंडोल शहराध्यक्ष मोसिन रजा, आवेश खान, माजी नगरसेवक अस्लम पिंजारी ,आरिफ शेख, असलम खान, हसनयन पठाण, गुड्डू शेख ,शाहरुख पठाण, फारुख मिस्तरी ,शाहिद मुजावर, सलमान ,तोफीक मुजावर एरंडोल चे पी आय सुनील पवार यांनीही कार्यक्रमाला भेट देऊन रक्तदात्यांचे कौतुक केले इतर कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button