जळगावताज्या बातम्याधार्मिकमहाराष्ट्र
ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय मध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

प्रतिनिधी – येथील ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय तर्फे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पुष्पा दिदी , छाया दिदी , सविता दिदी यांनी पोलिस निरीक्षक सुनील पवार , नगरसेवक रवींद्र महाजन, माजी नायब तहसीलदार अरुण माळी, ॲड. दिनकर पाटील, पुंडलिक पाटील, इंगळे सर यांना राखी बांधून औक्षण करून सण साजरा करण्यात आला. या वेळी अनेक नागरिक व महिलांची उपस्थिती होती.
रक्षाबंधन सण साजरा करण्यात ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय सोबत जुळलेल्या माता , बंधू , श्रीकांत भाई यांनी परिश्रम घेतले.





