जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

एरंडोल महाविद्यालयात युवती सभा मंचचे उद्घाटन व महिला सुरक्षा आणि कायदे या विषयाचे व्याख्यान संपन्न .

एरंडोल – येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या युती सभा मंच चे उद्घाटन संपन्न झाले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जे पाटील अध्यक्षस्थानी व मार्गदर्शक ॲड. काजल पांडे होते. मनीषा पाटील व खुशी बडगुजर या विद्यार्थिनींनी स्वागत गीत व इशस्तवन गाऊन कार्यक्रमाची सुरुवात केली.ॲड.काजल पांडे यांच्या हस्ते युवती सभा मंच उद्घाटन करण्यात आले यावेळी महाविद्यालयातील युवतींना मार्गदर्शन करताना अँड.काजल पांडे यांनी महिला सुरक्षा व कायदे यांच्या बद्दल सखोल मार्गदर्शन व आपले विचार मांडले कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतेतून युवती सभा सचिव डॉ.शर्मिला गाडगे चिकाटे यांनी युवती सभेची स्थापना, उद्देश, त्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.अध्यक्ष मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. जे पाटील यांनी युतींना कायदा आणि संविधानाचे महत्त्व विशद केले.
संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात १५० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. डॉ. मीना काळे यांनी सूत्रसंचालन केले व डॉ. सविता पाटील यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अरविंद बडगुजर ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. उमेश गवई, डॉ.सोपान साळुंखे, प्रा. सुनील सजगणे, डॉ. रेखा साळुंखे , प्रा.हर्षदा वारुडे , प्रा तेजल पाटील , प्रा माधुरी पाटील, प्रा रेणुका चव्हाण इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button